अमरावती येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याची स्वच्छता आणि अभिवादन !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या दिनांकानुसार असणाऱ्या जयंतीनिमित्त शहरातील सातुर्णा परिसरातील ‘गुरुकुल’ या क्रीडा सभागृहाच्या प्रांगणात असलेल्या पुतळ्याची हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांच्या वतीने स्वच्छता करण्यात आली. पूजन आणि पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.