गेल्या अनेक दशकांचा इतिहास साक्षी आहे की, आजपर्यंत कधी भारताने सत्तेच्या लालसेपोटी कुठल्या देशावर स्वतःहून आक्रमणे केली नाहीत. भारतावर यवन आणि इंग्रज यांनी अनेकदा आक्रमणे करून भारताची ज्ञानसंपत्ती, आर्थिक संपत्ती, संस्कृती आणि शिक्षणव्यवस्थेचा अनमोल ठेवा इत्यादींची लुटालूट करून भारताला ओरबाडले आहे, तरीही भारत ही अवतार आणि संत यांची भूमी असल्याने आजही भारत जगाला अध्यात्माचे ज्ञान देण्याची क्षमता ठेवतो; यामुळेच भारत देश ‘विश्वगुरु’ पदावर आरूढ असण्यास आजही पात्र आहे.
– कु. रजनीगंधा कुऱ्हे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.१२.२०२१)