अमरावती, ३० मे (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या दिनांकानुसार असणाऱ्या जयंतीनिमित्त शहरातील सातुर्णा परिसरातील ‘गुरुकुल’ या क्रीडा सभागृहाच्या प्रांगणात असलेल्या पुतळ्याची हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांच्या वतीने स्वच्छता करण्यात आली. पूजन आणि पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
या वेळी उपस्थित राष्ट्र-धर्मप्रेमींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तेजस्वी अशा राष्ट्र-धर्म कार्याने प्रेरित होऊन पुढे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्न करण्याचा संकल्प करण्यात आला. ‘वन्दे मातरम्’ आणि ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’च्या घोषणा देण्यात आल्या. या वेळी हिंदु युवक सभेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री. अभिषेक दीक्षित आणि बजरंग दलाचे शहरप्रमुख श्री. उमेश मोवळे, तसेच सागर गुल्हाने, चेतन गुजर, विनायक लांजेवार, विमल पांडे यांसह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. ‘अशा उपक्रमांनी उत्साह निर्माण होतो’, अशी प्रतिक्रिया उपस्थित धर्मप्रेमींनी व्यक्त केली.