पुणे – शहरातील एका नामांकित वैद्यकीय महाविद्यालयामध्ये व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश देतो, असे सांगत महिला आधुनिक वैद्य यांच्यासह दोघींची ३२ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी ज्ञानेश्वर पाटील आणि स्नेहल पवार यांच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणी महिलेने तक्रार प्रविष्ट केली होती. आरोपी पाटील आणि पवार यांनी तक्रारदार महिलेच्या मुलाला व्यवस्थापन कोट्यातून वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश देतो, असे सांगत ७ लाख रुपये, तसेच महिला आधुनिक वैद्यांकडून २५ लाख रुपये घेतले होते. पैसे देऊनही प्रवेश मिळाला नसल्यामुळे संपर्क साधल्यानंतरही उडवाउडवीची उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या दोघींनी तक्रार प्रविष्ट केली.
संपादकीय भूमिकाफसवेगिरीचे वाढते प्रमाण पहाता प्रत्येक गुन्हेगाराला कठोर शिक्षाच होणे आवश्यक आहे ! |