संभाजीनगर – झटपट पैसे कमावण्याच्या लालसेने बुशरा परवीन शेख नईम आणि संजयनगर येथील तिची सावत्र बहीण मुन्नी बेगम हुसेन खान हिच्यासमवेत मिळून शहरातील मोठ्या सराफांच्या दुकानात लूटमार चालू केली होती. रिलायन्स मॉलमध्ये १९ मे या दिवशी २ सोन्याच्या बांगड्या चोरल्यानंतर गुन्हे शाखेने कसून शोध घेत या २ सावत्र बहिणींना अटक केली. या बहिणी सीसीटीव्हीच्या चित्रणात अडकू नयेत म्हणून चोरी केल्यानंतर घरी जाईपर्यंत ८-१० वेळेला रिक्शा पालटून रस्त्यात मिळेल तेथे कपडे पालटत होत्या. गजानन महाराज मंदिर रस्त्यावर असलेल्या मोठ्या दालनातून २ महिलांनी दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने अडीच तोळे सोन्याच्या बांगड्यांची चोरी केली होती.
संपादकीय भूमिकास्वतःला अल्पसंख्यांक म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! धर्मांध महिलांचाही गुन्हेगारीतील वाढता सहभाग देशासाठी घातक ! अशा महिलांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे ! |