आतंकवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून काश्मीर विश्‍वविद्यालयातील १५ प्राध्यापक होणार निलंबित !

प्राध्यापक महंमद हुसैन पंडित

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीर सरकारने काश्मीर विश्‍वविद्यालयातील साधारण १५ प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना  आतंकवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. यांव्यतिरिक्त २४ जण असेही आहेत की, ज्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. विश्‍वविद्यालयातील रसायन विज्ञान विभागाचे प्राध्यापक महंमद हुसैन पंडित यांना याआधीच बडतर्फ करण्यात आले आहे. हुसैन हे फुटीरतावादी नेते अली शाह गिलानी यांचे निकटवर्तीय मानले जाते, तसेच विश्‍वविद्यालयातील कट्टर फुटीरतावादी कार्यकर्त्यांशी त्यांचा संबंध असल्याचेही सांगण्यात आले आहे. आतंकवादी आणि फुटीरतावादी यांची संपर्क यंत्रणा सिद्ध करण्याचे काम ‘कश्मीर विश्‍वविद्यालय शिक्षक संघ’ करत आहे.

ज्या प्राध्यापकांवर कारवाई करण्यात येणार आहे, त्यांच्यावर आतंकवादी आणि फुटीरतावादी यांच्यात एक वैचारिक यंत्रणा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आरोप आहेत.

संपादकीय भूमिका

  • जेथे प्राध्यापक हे आतंकवादाला प्रसृत करण्यात सहभागी होत असतील, तेथील विद्यार्थ्यांना कशाचे बाळकडू दिले जात आहे, हे वेगळे सांगायला नको ! अशा सर्वांवर कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी !