१ सहस्र ५०० हिंदुत्वनिष्ठांचा सहभाग !
मुंबई – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुढीपाडव्यापासून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. यामध्ये प्रवचन, सामूहिक नामजप, हिंदु राष्ट्रासाठी देवतांना साकडे घालणे, फलकप्रसिद्धी यांचा समावेश आहे. या अंतर्गत मुंबई, नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यांत विविध ठिकाणी साकडे घालण्यात आले. मुंबईत शीव, मुलुंड (नानेपाडा, बाबाजी की झोपडी, स्वयंभू मारुति मंदिर), घाटकोपर (शिवप्रसाद को-ऑप. हौ. सोसायटी), वरळी (जांबोरी मैदान, सयानी मार्ग), परळ, झावबा श्रीराम मंदिर (ठाकूरद्वार), गिरगाव, अंधेरी (म्हातारपाडा), जोगेश्वरी (अंबिकानगर) येथे आणि ठाण्यातील भाईंदर, मीरारोड, बोईसर (पास्थळ), नवी मुंबईच्या कोपरखैरणे येथील सेक्टर ३, ४, ७, १०, १२, तसेच नेरुळ, खारघर, शिरवणे, ऐरोली या ठिकाणच्या मंदिरांत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी देवतांना साकडे घालण्यात आले. या वेळी स्थानिक नागरिक, धर्मप्रेमी हिंदू आणि सनातन प्रभातचे वाचक यांनी यात सहभाग घेतला होता. १० एप्रिलपासून आतापर्यंत वरील सर्व ठिकाणी मिळून एकूण ५४ ठिकाणी साकडे घालण्यात आले. यामध्ये १ सहस्र ५०० हून अधिक हिंदूंनी सहभाग घेतला.