वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यात २ सहस्र ३५८ लाख लिटर मद्याची विक्री !
मद्यसम्राटांसाठी युवापिढीला मद्यपी बनवून महसूल मिळवायचा कि युवा पिढीला सक्षम बनवायचे ? हे सरकारने ठरवावे. मद्याच्या विक्रीत होणारी वाढ, ही महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही ! – संपादक
मुंबई – वर्ष २०१९-२० मध्ये राज्यात २ सहस्र १५७ लाख लिटर मद्याची विक्री झाली होती. त्यानंतर कोरोनामुळे वर्ष २०२०-२१ मध्ये मद्यविक्रीचे प्रमाण १ सहस्र ९९९ लाख लिटरपर्यंत न्यून झाले. मद्याची दुकाने उघडल्यामुळे वर्ष २०२१-२२ मध्ये मद्यविक्रीचे प्रमाण वाढले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने २०२१-२२ मध्ये मागील ३ आर्थिक वर्षांतील सर्वाधिक महसूल गोळा केला आहे. वर्ष २०२१-२२ मध्ये उत्पादन शुल्क विभागाला १८ सहस्र कोटी रुपये महसूल जमा करण्याचे लक्ष्य देण्यात आले होते; परंतु हे लक्ष्य पूर्ण झाले नाही. वर्ष २०२०-२१ च्या तुलनेत वर्ष २०२१-२२ मध्ये मद्याच्या विक्रीत १४ टक्के इतकी वाढ झाली आहे.