१५ एप्रिलला नवा घोटाळा उघडकीस आणणार ! – किरीट सोमय्या, भाजप

मुंबई – उद्या (१५ एप्रिल) महाविकास आघाडीचा नवा घोटाळा उघडकीस आणणार आहे, अशी चेतावणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी १४ एप्रिल या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. मी ‘नॉट रिचेबल’ का झालो होतो ? याचे उत्तरही या वेळ देईन, असे सोमय्या म्हणाले.

या वेळी किरीट सोमय्या म्हणाले, ‘‘मुंबई महाराष्ट्राचा अभिमान आहे. त्यामुळे मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा प्रश्नच येत नाही. मुंबई केंद्रशासित होणार नाही. ही ‘स्टंटबाजी’ करून संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यावरून घोटाळ्यांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. घोटाळेबाजांकडील पैसा पुन्हा जनतेच्या तिजोरीत जमा करणे, हा माझा धर्म आहे.’’