#Gudhipadva : जाणून घ्या पंचांगातील गुढीपूजन करतांनाचा ‘देशकाल’ !

कोणताही धार्मिक विधी करतांना देशकाल कथनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूजेचा संकल्प करण्याआधी देशकाल म्हटले जाते. यातून मनुष्याला एकूण अनंत काळाची व्याप्ती कळून येते. यातून त्याला स्वत:च्या सूक्ष्मत्वाची जाणीव झाल्याखेरीज रहात नाही.

यंदाच्या गुढीपाडव्याला गुढी उभारतांना पुढील देशकाल म्हणावा

डोळ्यांना पाणी लावावे. (भारतातील लोकांनी म्हणावयाचा देशकाल) श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्‍वेत-वाराहकल्पे वैवस्वत मन्वंतरे अष्टाविंशतितमे युगे युगचतुष्के कलियुगे कलि प्रथम चरणे जंबुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे दक्षिणापथे रामक्षेत्रे बौद्धावतारे दंडकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणतीरे शालिवाहन शके अस्मिन् वर्तमाने व्यावहारिके प्लनाम संवत्सरे, उत्तरायणे, वसंतऋतौ, चैत्रमासे, शुक्लपक्षे, प्रतिपद् तिथौ, भौम वासरे, अश्‍विनी दिवस नक्षत्रे, विष्कंभ योगे, बव करणे, मेष स्थिते वर्तमाने श्रीचंद्रे, मीन स्थिते वर्तमाने श्रीसूर्ये, कुंभ स्थिते वर्तमाने श्रीदेवगुरौ, मकर स्थिते वर्तमाने श्रीशनैश्‍चरौ एवंग्रहगुणविशेषेणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ.

#Gudhipadva #Gudhipadwa #गुढीपाडवा #युगादि #युगादी #hindunewyear #hindunavvarsh #हिन्दूनववर्ष