(म्हणे) ‘स्वातंत्र्यवीर सावरकर बाँबप्रेमी !’ : मध्यप्रदेशमधील काँग्रेसचे प्रवक्ते के.के. मिश्रा यांचा सावरकरद्वेष !

ज्यांना क्रांतीकारकांच्या सशस्त्र क्रांतीचा इतिहासच ठाऊक नाही, त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार ? गेल्या ७ दशकांहून अधिक काळ स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा द्वेष करणार्‍या काँग्रेसला आता राष्ट्रप्रेमींनी मतपेटीद्वारे तिला जागा दाखवून द्यावी !

‘सॅफ्रॉन थिंक टँक’ या मुंबईस्थित हिंदु संघटनेच्या समान नागरी कायद्याची मागणी करणार्‍या ‘ऑनलाईन’ स्वाक्षरी मोहिमेला दीड लाख लोकांचा प्रतिसाद !

लग्न आणि घटस्फोट याविषयी विविध कायद्यांमधल्या वेगवेगळ्या तरतुदींमुळे वाद निर्माण होत असून ते संपुष्टात आणण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी समान नागरी कायदा लागू करणे आवश्यक आहे.

जागतिक स्तरावरील ‘बोल्ट्झमन’ पुरस्कार डॉ. दीपक धर यांना घोषित !

त्यांच्या रूपाने भारताला पहिल्यांदाच हा मान मिळत आहे. डॉ. धर सध्या ‘भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे’ (आयसर) येथे भौतिकशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

इंडियन नॅशनल लीगचा कर्नाटक प्रदेशाध्यक्ष अब्दुल रहीम याला अटक

हिजाबच्या वादावरून हिंदूंच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या प्रकरणी सायबर शाखेच्या पोलिसांनी इंडियन नॅशनल लीगचा कर्नाटक प्रदेशाध्यक्ष अब्दुल रहीम याला अटक केली.

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांकडून हिंदु कुटुंबातील सदस्यांना घरात घुसून मारहाण

उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशी घटना घडू नये, असेच हिंदूंना वाटते ! या हिंदूंना सरकारने तात्काळ संरक्षण दिले पाहिजे !

भारताने कधीही कुणाची एक इंचही भूमी बळकावलेली नाही ! – राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री

हे सत्य असले, तरी भारताने स्वातंत्र्याच्या वेळीच एक मोठा प्रांत गमावला आणि तेथे पाकिस्तान नावाचा देश निर्माण होऊन तो भारताला गेली ७५ वर्षे त्रास देत आहे. पाकच्या आक्रमणानंतर काश्मीरचा मोठा भाग गमावला.

निवडलेल्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी केल्यास ‘आत्मनिर्भर भारता’चे स्वप्न साकार होईल ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

निवडलेल्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी केल्यास आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होईल, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांची नियुक्ती !

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी राज्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी पोलीस आयुक्त पदावर असलेले हेमंत नगराळे यांचे राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी स्थानांतर करण्यात आले आहे.

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या साखर कारखान्यावर ‘ईडी’ची धाड !

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नागपूर येथील साखर कारखान्यावर अंमलबजावणी संचालनालयाने धाड टाकून १३ कोटी ४१ लाख रुपयांची मालमत्ता कह्यात घेतली आहे.

नवी मुंबईतील भूमीपुत्रांनी २५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत बांधलेली घरे नियमित होणार ! – एकनाथ शिंदे, नगरविकासमंत्री

एकनाथ शिंदे म्हणाले की, या निर्णयामध्ये वर्ष १९७० गावठाणांच्या हद्दीपासून विस्तारीत गावठाणांची हद्द २५० मीटरपर्यंत वाढवण्यात आली आहे. या क्षेत्रातील सर्वच गरजेपोटी बांधलेली घरे नियमित होणार आहेत.