राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात पुणे महापालिकेच्या दारात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन !

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी काँग्रेसने २८ फेब्रुवारी या दिवशी आंदोलन केले.

‘मावळ्यांची शाळा’ हा अभिनव उपक्रम राबवणार ! – छत्रपती उदयनराजे भोसले

सातारा, २८ फेब्रुवारी (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेला हिंदवी स्वराज्याचा लढा आधुनिक पद्धतीने शालेय मुला-मुलींपर्यंत पोचवणारा ‘मावळ्यांची शाळा’ हा अभिनव उपक्रम चालू करणार आहे, अशी घोषणा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली. येथील गांधी मैदानावर आयोजित वाढदिवसाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती … Read more

मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात रस्ता बंद आंदोलन !

मुंबई येथे छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी चालू केलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर शहरात दसरा चौक आणि रंकाळा बसस्थानक परिसर येथे २८ फेब्रुवारी या दिवशी रस्ता बंद आंदोलन करण्यात आले.

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या विरोधात खटला चालवण्याचे राज्यपालांचे आदेश !

बनावट दस्ताऐवज बनवून शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीने काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षण राज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या विरोधात राज्यपालांकडे तक्रार केली होती.

राजकारण न करता शेतकर्‍यांच्या उसाचे गाळप करा !

बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या साखर कारखानदार प्रशासनातील अधिकार्‍यांना सूचना

चाणक्याविना चंद्रगुप्ताला आणि समर्थांविना शिवाजीला कोण विचारेल ? – राज्यपाल कोश्यारी

महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणाक्याविना चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांविना शिवाजीला कोण विचारेल ? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे आईचे मोठे योगदान असते, तसेच आपल्या समाजात गुरूंचे मोठे स्थान असते.

राज्यातील आयुर्वेद रुग्णालये शहरापासून दूर असल्यामुळे रुग्णालयांमध्ये रुग्णांची वानवा !

महाविद्यालयापासून किंवा शहरापासून आयुर्वेद रुग्णालये दूर असल्याने तिकडे रुग्ण येत नाहीत. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र वगळता अन्य जिल्ह्यांतील आयुर्वेद रुग्णालयामध्ये रुग्णांची कमतरता भासत आहे.

माहिती अधिकारातील उत्तरावरून कराड नगरपालिकेच्या अधिकार्‍यास मारहाण

नगरपालिकेमध्ये एका व्यक्तीने माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती. ती नगर रचनाकार अधिकार्‍याने अर्जदारास दिली; मात्र माहिती अशीच का दिली ? या कारणावरून चिडून त्या व्यक्तीने नगर रचनाकार यांना मारहाण केली.

अणूयुद्धाचा धोका !

अणूबाँबच्या किरणोत्सर्गाचा परिणाम जपानमधील लोक आजही भोगत आहेत, तर आताच्या अणूबाँबचा परिणाम पुढील किती शतके मानवजातीला भोगावा लागेल, याची कल्पना करता येत नाही.

राज्यशासनाने मागण्या मान्य केल्याने खासदार छत्रपती संभाजीराजे यांचे आमरण उपोषण स्थगित !

मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या अन्य काही मागण्या यांसाठी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी ३ दिवसांपासून आझाद मैदानावर आमरण उपोषणाला प्रारंभ केला होता. राज्यशासनाने त्यांच्या मागण्या मान्य केल्यामुळे त्यांनी उपोषण मागे घेतले.