ज्यांना क्रांतीकारकांच्या सशस्त्र क्रांतीचा इतिहासच ठाऊक नाही, त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार ? गेल्या ७ दशकांहून अधिक काळ स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा द्वेष करणार्या काँग्रेसला आता राष्ट्रप्रेमींनी मतपेटीद्वारे तिला जागा दाखवून द्यावी ! – संपादक
भोपाळ – मध्यप्रदेशचे काँग्रेसचे प्रवक्ते के.के. मिश्रा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘बाँबप्रेमी’ असे संबोधले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त मिश्रा यांनी ट्विट करून स्वा. सावरकर यांच्या पुस्तकातील एक पृष्ठ प्रसारित केले आहे. ‘आतंकवादामध्ये स्वस्त, सोपे आणि प्रभावशाली हातबाँब इत्यादी शस्त्रांचा रशियासारख्या देशामध्ये वापर होऊ लागला आहे. भारतात या कलेचा प्रचार अद्याप लोकांमध्ये सहजपणे झालेला नाही. त्यामुळे हे ‘बाँबशास्त्र’ शिकण्याची आमची इच्छा आहे ’, असे सावरकर यांनी ‘सावरकर समग्र, भाग १, पृष्ठ क्र. ३३६३’ वर लिहिले आहे, असा दावा मिश्रा यांनी केला आहे. (‘समाजाला सशस्त्र करून ब्रिटिशांच्या विरोधात लढण्यासाठी एकत्रित केल्यास लवकर स्वातंत्र्य मिळेल’, हा स्वा. सावरकर यांचा मानस होता. असे असतांना त्यांना ‘बाँबप्रेमी’ म्हणणे ही काँग्रेसवाल्यांची बौद्धिक दिवाळखोरी होय ! – संपादक)