|
इस्लामाबाद (पाकिस्तान)- महिला अधिकारांसाठी लढणार्या एका पाकिस्तानी महिला अधिवक्त्याने पाकिस्तानी समाजाचे खरे वास्तव जगासमोर आणले. एका वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रामध्ये बोलतांना त्या म्हणाल्या, ‘‘बलात्कार पीडित अल्पवयीन मुलींना, ‘तुमच्यावर बलात्कार कुणी केला ?’, असे विचारण्यात येते. तेव्हा ८२ टक्के मुलींकडून त्यांचे काका, वडील, वडिलांचे वडील, आईचे वडील, मामा, भाऊ, अशी नावे समोर येतात; म्हणजे घरातील सदस्यांकडूनच लहान मुलींवर बलात्कार होतात. याविषयी समाजात वाच्यता होऊ नये; म्हणून कुटुंबीय या मुलींचा गर्भपात करतात आणि त्यांच्या कृत्यांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करतात. यावर मी ३ वर्षे काम केले. तेव्हा समाजाचा घृणित तोंडवळा माझ्या समोर आला. लोक म्हणतात, ‘हे पाशवी कृत्य आहे !’ हे पाशवी कृत्य मनुष्यच करतो.
Yeh Pakistan ka video hai es video ko dekh ke lagta hai hijab school me nahi enke ghar me hona chaiye en logo ke yahan 82,% ladkiyo ka rape 16 saal ke Umar se pehle he unke he baap ,Bhai chacha , mama, fufa he kar lete hai pic.twitter.com/K831yRBuqr
— Renu Gupta (@RenuGTwi) February 15, 2022
यावर आपण चर्चा केली, तर ही समस्या सुटेल; पण यावर कुणी बोलत नाही. ही आकडेवारी आमची एक संस्था ‘डब्लू.ए.आर्’ने दिली आहे.’’ या चर्चासत्राचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. या महिला अधिवक्त्याचे नाव मात्र समजू शकले नाही.