
कोल्हापूर, १७ फेब्रुवारी (वार्ता.) – प्रशासनाला शिवजयंतीचे वावडे का ? ठराविक सणांवर आणि ठराविक समाजावर प्रशासनाचा नेहमीच आसूड का असतो ? या वर्षीची शिवजयंती ही तितक्याच उत्साहात मिरवणूक काढून साजरी करणार आहे. गुन्हे नोंद करा किंवा अटक करा; पण मिरवणूक निघणारच, अशी चेतावणी शिवसेना नेते रविकिरण इंगवले यांनी दिली आहे.
या संदर्भात इंगवले यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, ‘‘प्रशासनाच्या वतीने शिवजयंतीच्या मिरवणुकीवरती निर्बंध लादल्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण आहे. गोकुळ निवडणूक, जिल्हा बँक निवडणूक, राजकीय सभा या वेळी कोरोनाचे किती नियम पायदळी तुडवले गेले होते. त्या वेळी प्रशासनाने कोणती भूमिका घेतली होती. केवळ शिवजयंती मिरवणुकीसाठी वेगळा न्याय का ? जर प्रशासन आडमुठेपणा आणि चुकीच्या नियमांच्या आधारे अनुमती नाकारत असेल, तर शिवाजी पेठेसाठी अन् छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी अनेक गुन्हे अंगावर घेण्यासाठी मी सिद्ध आहे.’’
Himachal Pradesh Calamity : हिमाचल प्रदेश : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी
नेत्रदीपक रिंगण आणि बंधूभेटीनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये आगमन !
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !