
कोल्हापूर, १७ फेब्रुवारी (वार्ता.) – शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या पोकळ धमक्यांना भाजप घाबरत नाही. भाजपच्या विरोधकांनी हे ध्यानात घ्यावे की, हा नवा भाजप आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा १०० जणांनी प्रयत्न केला, तर पाठिंब्यासाठी भाजपचे १ सहस्र कार्यकर्ते पोचले. किरीट सोमय्या यांच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न झाल्यावर त्यांच्या समर्थनार्थ सहस्रो कार्यकर्ते उतरले, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
संजय राऊत यांच्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर; पुरावे तपास यंत्रणांकडे द्यावेत https://t.co/KRkehd3Y5h
— भारत लाइव्ह मीडिया (@BLaevh) February 15, 2022
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, ‘‘महाविकास आघाडी सरकारने अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्जाची मर्यादा साडेसात लाखांपर्यंत वाढवली; पण मराठा युवकांसाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून दिली जाणारी १० लाख रुपये बिनव्याजी कर्जाची योजना ठप्प केली. महाविकास आघाडी सरकारने अरबी समुद्रातील शिवस्मारकाला असलेली स्थगिती उठवण्यासाठी २ वर्षांत पाठपुरावा केला नाही. या सरकारला मराठा आरक्षण देण्याची इच्छा नाही. मराठा समाजासाठी छत्रपती संभाजी राजे यांच्या उपोषणाला भाजपने पाठिंबा दिला आहे. मराठा समाजासाठी जे कुणी रस्त्यावर उतरतील त्यांना भाजप पाठिंबा देईल.’’
बोधगया येथे महाराष्ट्र्राच्या यात्रेकरूंना मिळणार कायमस्वरूपी निवास सुविधा ! – सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट
जलसंपदा विभागाकडून शेतकर्यांशी संबंधित सर्वच प्रक्रिया ऑनलाईन करणार ! – डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदामंत्री
‘कारगिल विजयदिना’निमित्त डोंबिवली येथे ‘ऑपरेशन कारगिल’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ या मोहिमांतील अनुभवकथनाचा कार्यक्रम !
सार्वजनिक ठिकाणी कचरा करण्यांविरुद्ध गुन्हा नोंदवा !
श्रीक्षेत्र कांदळी (ता. जुन्नर) येथे २९ जुलैला गुरुपौर्णिमेचे आयोजन !
पुणे येथे ‘हलाल अर्थव्यवस्था आणि भारत’ या विषयावर श्री. रमेश शिंदे यांचे ३१ जुलैला जाहीर व्याख्यान !