गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांकडून हिजाबच्या समर्थनार्थ विनाअनुमती आंदोलन करून पोलिसांशी असभ्य वर्तन

 पोलिसांकडून लाठीमार

विनाअनुमती आंदोलन करण्याचे धर्मांधांचे पुन्हा धाडस होऊ नये, यासाठी त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे !

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील खोडा भागात हिजाबच्या समर्थनार्थ बुरखा घालून विनाअनुमती आंदोलन करणारे २५ ते ३० धर्मांध स्त्री आणि पुरुष यांना पोलिसांनी रोखल्यावर धर्मांधांनी पोलिसांशी असभ्य वर्तन केले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार करून त्यांना पांगवले. या घटनेचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.

पोलिसांनी सांगितले की, राज्यात निवडणुकांमुळे आचारसंहिता आणि जमावबंदी आदेश लागू असतांना हे विनाअनुमती आंदोलन करण्यात आले होते. या प्रकरणी २० जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या आंदोलनाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. त्याद्वारे आंदोलनकर्त्यांची ओळख पटवून त्यांचा शोध घेतला जात आहे. इम्राना आणि मुस्कान यांची चौकशी केली जात आहे. यातील मुख्य आरोपी नजर महंमद असून तो एम्.आय.एम्. पक्षाशी संबंधित आहे. त्यानेच ‘हे आंदोलन एम्.आय.एम्.चे आहे’, असे सांगून मुस्कान हिला महिलांना बोलावण्यास सांगितले होते. पोलिसांकडून नजर महंमद याचा शोध घेतला जात आहे.