‘नाटो’चा सदस्य बनणे, हाच युक्रेनसमोर एकमेव पर्याय ! – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की

रशिया-युक्रेन सीमासंघर्ष

रशियाचा तीव्र विरोध !

कीव (युक्रेन) – युक्रेनला ‘नाटो’ (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) या ३० देशांच्या सैनिकी सहकार्य संघटनेचा सदस्य बनल्यासच त्याच्या संरक्षणाची हमी मिळू शकेल. त्यामुळे ‘नाटो’चा सदस्य बनणे, हाच युक्रेनसमोर एकमेव पर्याय आहे, असे वक्तव्य युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वॉलॉदीमीर झेलेन्स्की यांनी केले. आमच्यासाठी ‘नाटो’चा सदस्य देश बनणे वाटते तितके सोपे नाही, असेही झेलेन्स्की यांनी सांगितले.


दुसरीकडे झेलेन्स्की यांच्या या भूमिकेला रशियाने तीव्र विरोध दर्शवला आहे. ‘असे होऊ नये’, याविषयी पाश्‍चात्त्य देशांनी रशियाला आश्‍वस्त करावे, असे रशियाचे म्हणणे आहे.