‘व्हॅलेंटाईन डे’च्या संदर्भात पोलिसांना योग्य त्या कृती करण्याच्या सूचना देऊ ! – डॉ. मोहन भस्मे, तहसीलदार, निपाणी

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘व्हॅलेंटाईन डे’च्या संदर्भात होणारे अपप्रकार रोखण्यासाठी त्यांना निवेदन दिल्यावर त्यांनी हे आश्वासन दिले.

धर्माच्या नावावर देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न चालू आहे ! – मद्रास उच्च न्यायालय

हे खरोखर धक्कादायक आहे की, काही लोक हिजाबच्या बाजूने आहेत, काही टोपीच्या बाजूने आहेत, तर काही इतर गोष्टींच्या बाजूने आहेत. हा देश एकसंघ आहे कि धर्माच्या आधारावर विभागला गेला आहे ?

हिजाबचे प्रकरण राष्ट्रीय सूत्र बनवू नका ! – सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला

कर्नाटकातील हिजाब प्रकरणी प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ११ फेब्रुवारी या दिवशी पुन्हा सुनावणी झाली. ‘आम्ही योग्य वेळी या याचिकेवर सुनावणी करू. तुम्ही हे राष्ट्रीय सूत्र बनवू नका’, असे न्यायालयाने सांगितले.

हरिहर (कर्नाटक) येथे ३०० हून अधिक धर्मांधांच्या जमावाकडून हिंदु दुकानदाराला मारहाण

कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंना धर्मांधांकडून अशा प्रकारे मारहाण होणे हिंदूंना अपेक्षित नाही ! अशा धर्मांधांवर आता कारवाई होऊन त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !

‘सुदर्शन टीव्ही’चे संपादक सुरेश चव्हाणके यांना संरक्षण द्या !  

देशात एकतरी धर्मांध नेत्याला असे संरक्षणात रहावे लागते का ? हिंदूंना ‘असहिष्णु’, ‘तालिबानी’, ‘भगवे आतंकवादी’ म्हणणारे याचे उत्तर देतील का ?

भाग्यनगर (तेलंगाणा) येथील महाविद्यालयातही हिजाबला विरोध करण्यात येत असल्याचा मुसलमान विद्यार्थिनीचा आरोप

आता संपूर्ण देशात जाणीवपूर्वक हिंदूंना अपकीर्त करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करण्यात येतील, हे लक्षात घ्या ! हिजाबच्या नावाखाली चालू असलेले षड्यंत्र जाणा !

कुठे आदर्श प्रभु श्रीराम आणि कुठे आजचे अकार्यक्षम राजकारणी !

‘कुठे सहस्रो दावे प्रलंबित असतांना काही कृती न करणारी आतापर्यंतची सरकारे, तर कुठे जनतेतील एकाने केवळ संशय व्यक्त केल्यावर सीतेचा त्याग करणारे प्रभु श्रीराम ! . . . तर राजकारण्यांना जनता काही वर्षांतच विसरते.’ –  (परात्पर गुरु) डॉ. आठवले   

मुंबईतील एका महाविद्यालयात पूर्वीपासूनच हिजाबवर बंदी !

एखाद्या ठिकाणी पूर्वीपासून हिजाबवर बंदी असतांना कुणी आकांडतांडव केला नाही, मग यावरून आताच पोटशूळ उठण्यामागे धार्मिक विद्वेष निर्माण करण्याचा हेतू तर नव्हे ना ? याची अन्वेषण यंत्रणांनी पडताळणी केली पाहिजे !

जगातील फ्रान्स, अमेरिका, जर्मनी आदी देशांमध्ये आहे शाळेत हिजाब घालण्यावर बंदी !

जर जगातील शक्तीशाली आणि पुरोगामी देश हिजाबवर बंदी घालत असतील, तर पुरोगामी म्हणून ओळख सांगणार्‍या भारतामध्ये हिजाबवर शाळा, महाविद्यालये यांमध्ये बंदी घालण्यास पुरो(अधो)गाम्यांचा विरोध कशाला ?