मुंबईतील एका महाविद्यालयात पूर्वीपासूनच हिजाबवर बंदी !

मुंबई – येथील मुलींच्या एस्.एन्.डी.टी. (नाथीबाई दामोदर ठाकरसी) विद्यापीठ संचालित एम्.एम्.पी. शाह महाविद्यालयात पूर्वीपासूनच हिजाब, स्कार्फ, बुरखा आणि घुंगट यांवर बंदी आहे. त्यामुळे आता या महाविद्यालयावरही टीका होऊ लागली आहे. (एखाद्या ठिकाणी पूर्वीपासून हिजाबवर बंदी असतांना कुणी आकांडतांडव केला नाही, मग यावरून आताच पोटशूळ उठण्यामागे धार्मिक विद्वेष निर्माण करण्याचा हेतू तर नव्हे ना ? याची अन्वेषण यंत्रणांनी पडताळणी केली पाहिजे ! – संपादक)

प्रतिकात्मक छायाचित्र

प्राचार्या डॉ. लीना राजे

वरील नियम शाह महाविद्यालयाच्या नियमावलीच्या पुस्तिकेत नोंदही केलेला आहे. ‘पूर्वी मुले अशा प्रकारचे कपडे घालून मुलींना त्रास देत होती. हे लक्षात आल्यानंतर मुलींच्या सुरक्षिततेसाठी आम्ही हा नियम लागू केला आहे. या नियमानुसार आम्ही मुलींना वर्गामध्ये बुरखा किंवा घुंगट काढून ठेवण्यास सांगतो. ‘वर्गात इतर मुलींना चेहरा दिसण्यासाठी बुरखा काढून ठेवा आणि जातांना तो घाला’, असे आम्ही सांगितले आहे. यामागे विद्यार्थ्यांची सुरक्षा हेच सूत्र आहे’, अशी प्रतिक्रिया एम्.एम्.पी. शाह महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. लीना राजे यांनी ‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळाला दिली आहे.