‘सुदर्शन टीव्ही’चे संपादक सुरेश चव्हाणके यांना संरक्षण द्या !  

सुरेश चव्हाणके यांच्यासह ११ हिंदुत्वनिष्ठांची हत्या करण्याचे धर्मांधांचे षड्यंत्र उघड झाल्याने राज्यसभेत भाजपच्या खासदाराची मागणी

  • धर्मांध हे हिंदुत्वनिष्ठांची हत्या करण्याचे षडयंत्र रचतात आणि हत्याही करतात, हे हिंदूंना लज्जास्पद ! – संपादक 
  • हिंदुबहूल भारतात हिंदुत्वनिष्ठांना संरक्षणात रहावे लागते, तसेच त्यांना संरक्षणाची मागणी करावी लागते,  हे हिंदूंना लज्जास्पद ! – संपादक
  • देशात एकतरी धर्मांध नेत्याला असे संरक्षणात रहावे लागते का ? हिंदूंना ‘असहिष्णु’, ‘तालिबानी’, ‘भगवे आतंकवादी’ म्हणणारे याचे उत्तर देतील का ? – संपादक
डावीकडून भाजपचे खासदार कैलाश सोनी आणि किशन बोलिया

नवी देहली – ‘सुदर्शन टीव्ही’चे संपादक सुरेश चव्हाणके यांना संरक्षण पुरवण्यात यावे, अशी मागणी भाजपचे खासदार कैलाश सोनी यांनी राज्यसभेत केली. ते गुजरातमधील किशन बोलिया (भरवाड) याच्या धर्मांधांनी केलेल्या हत्येविषयी बोलत होते. किशन यांची हत्या करण्यासाठी मौलाना (इस्लामी विद्वान) शब्बीर याने आरोपींना सांगितले होते, तसेच शब्बीर याने अन्य ११ जणांचीही हत्या करण्यास सांगितले असल्याचे उघड झाले आहे. यात सुरेश चव्हाणके यांच्यासह उत्तरप्रदेशातील डासना येथील मंदिराचे महंत यती नरसिंहानंद, बी.एस्. पटेल, पंकज शर्मा, पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, महेंद्रपाल आर्य, राहुल शर्मा, राधेश्याम आचार्य, उपदेश राणा, उपासना आर्य आणि ‘रॉ’चे माजी अधिकारी आर्.एस्.एन्. सिंह यांचीही नावे होती.

सोनी पुढे म्हणाले की, मौलाना शब्बीर याने चौकशीत सांगितले की,  किशन याची हत्या करण्याचा उद्देश धार्मिक तणाव निर्माण करून देशात अराजकता निर्माण करायचा होता. देशातील सध्या ५ राज्यांत होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न होता.