भाग्यनगर (तेलंगाणा) येथील महाविद्यालयातही हिजाबला विरोध करण्यात येत असल्याचा मुसलमान विद्यार्थिनीचा आरोप

महाविद्यालयाने आरोप फेटाळला !

आता संपूर्ण देशात जाणीवपूर्वक हिंदूंना अपकीर्त करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करण्यात येतील, हे लक्षात घ्या ! हिजाबच्या नावाखाली चालू असलेले षड्यंत्र जाणा ! – संपादक

भाग्यनगर (तेलंगाणा) – कर्नाटकनंतर आता भाग्यनगरमध्येही हिजाबवरून वाद चालू झाला आहे. येथील सिकंदराबादमधील ‘सेवक अकादमी ऑफ रिहॅबिलिटेशन स्टडीज्’ची विद्यार्थिनी असलेल्या फातिमा नावाच्या विद्यार्थिनीने ट्वीट करून आरोप केला, ‘आमच्या संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. हनुमंत राव यांनी मुसलमान मुलींना बुरखा घालून महाविद्यालयात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.’ यावर डॉ. राव यांनी हा आरोप फेटाळून लावला. डॉ. राव म्हणाले की, आम्ही मुसलमान मुलींवर कोणतीही बंदी घातलेली नाही किंवा कोणतीही आक्षेपार्ह टिप्पणी केली नाही. आम्ही गेली ४५ वर्षे ही संस्था चालवत आहोत आणि प्रतिवर्षी शेकडो मुसलमान विद्यार्थिनी विविध विषयांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम घेतात. आमच्या विरोधात कधीही कोणत्याही विद्यार्थ्याने अशी तक्रार केलेली नाही.