सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारा !
समाजद्रोही आणि धर्मद्रोही निर्णय त्वरित मागे घ्या ! – सनातन संस्थेची मागणी
समाजद्रोही आणि धर्मद्रोही निर्णय त्वरित मागे घ्या ! – सनातन संस्थेची मागणी
नाशिक येथील महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे-जाधव यांचा चारचाकी वाहनामध्ये जळून मृत्यू झाला आहे. वाजे या मोरवाडी रुग्णालयात कार्यरत होत्या. वाडीवर्हे परिसरातील एका वाहनात त्यांचा मृतदेह सापडला आहे. याची माहिती परिसरातील नागरिकांनी पोलिसांना दिली.
महावितरण पुष्कळ तोट्यात आहे, त्यामुळे ‘वीजदेयके भरा’, असे आवाहन ऊर्जामंत्र्यांकडून वारंवार करण्यात येत आहे, तर दुसरीकडे देयके थकलेल्यांची वीजजोडणी कापण्यात येत आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या पिकांची ऐन हंगामात हानी होत आहे.
राष्ट्रगीताच्या माध्यमातून प्रत्येकामध्ये राष्ट्रभावना जागृत व्हावी आणि नव्या पिढीला ऊर्जा मिळावी, या उद्देशाने स्थापनेच्या दिवसापासून आम्ही राष्ट्रगीत चालू केले आहे.
गोवंश हत्याबंदीचा कायदा असतांना गोतस्करांचे पोलिसांवर आक्रमण करण्याचे धैर्य होते, हे सरकारला लज्जास्पद !
स्वसंस्कृतीतील महापुरुषांची नावे राष्ट्र आणि धर्म अस्मिता सदैव जागृत ठेवतात आणि परकीय आक्रमकांची नावे या अस्मितेचा लय करतात. देशातील सर्वत्रची परकीय आक्रमकांची नावे कायमस्वरूपी पुसण्यासाठी जनतेला हिंदु राष्ट्राची वाट पहावी लागणार आहे, असेच वाटते !
मुली-स्त्रिया यांचे मानसिक आणि आध्यात्मिक सबलीकरण आवश्यक आहे. त्यासाठी प्रतिदिन स्वरक्षण प्रशिक्षण, कुलदेवतेचा आणि ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप किमान १ घंटा करणे आवश्यक आहे, असे आवाहन सनातन संस्थेच्या वैद्या (श्रीमती) मृणालिनी भोसले यांनी केले.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेला ‘ख्रिस्ती राष्ट्र’ बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांना २८ गव्हर्नरांचे (राज्यांच्या प्रमुखांचे) समर्थनही मिळाले आहे. ट्रम्प यांना ‘ख्रिस्ती अमेरिकींचा नायक’ संबोधले जात आहे.
‘भारताच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये पुष्कळ सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. या सुधारणांचे स्वरूप पुढीलप्रमाणे असायला हवे.
भारतीय जनता, जिने आजवर असे नाकर्ते शासनकर्ते निवडून दिले. अशा जनतेचे येणार्या आपत्काळात देवाने तरी रक्षण का करावे ?’