परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे राष्ट्रविषयक मार्गदर्शन !
जीवनातील ८० टक्के शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अडचणी प्रारब्धामुळे येतात. या प्रारब्धावर केवळ साधनेने मात करता येते. यासाठी प्रत्येकाला साधना शिकवणे आवश्यक आहे. जनतेला खर्या अर्थाने आनंदी करण्यासाठी स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या सरकारने या सूत्राकडे लक्ष दिलेले नाही. खरे तर हे अप्रतिम ज्ञान भारताने जगातील सर्व देशांना शिकवले पाहिजे; पण आजवर यासाठी काहीच प्रयत्न झालेले नाहीत, हेही भारतासाठी लांच्छनास्पद आहे ! या सर्वांसाठी कारणीभूत आहे, भारतीय जनता, जिने आजवर असे नाकर्ते शासनकर्ते निवडून दिले. अशा जनतेचे येणार्या आपत्काळात देवाने तरी रक्षण का करावे ?’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले