|

नालासोपारा, २८ जानेवारी (वार्ता.) – तारापूर येथे गोहत्या करणार्या कसायांना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर या कसायांनी सशस्त्र आक्रमण केल्याची घटना २६ जानेवारी या दिवशी घडली. यामध्ये ३ पोलीस कर्मचारी घायाळ झाले असून ३ कसायांना अटक करण्यात आली आहे. अन्य फरार कसायांचा पोलीस शोध घेत आहेत.
साहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश जाधव यांना बजरंग दलाचे पालघर जिल्हा संयोजक चंदन सिंह यांनी माहिती दिली होती की, तारापूर येथील अन्सारी दमणवाला हा चोरून आणलेल्या गायी आणि गोवंश महंमद जोहेर शेख याच्या घराजवळील गोठ्यात कापण्यासाठी आणणार आहे. त्यानुसार जाधव यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाड टाकली. या वेळी तेथे गायी आणि गोवंशीय यांना कापण्याचे काम चालू होते. पोलिसांना पहाताच अन्सारी याने त्यांना चाकू आणि सुरा यांचा धाक दाखवून ‘येथून निघून जा नाहीतर जिवे ठार मारू’, अशी धमकी दिली. त्यानंतरही पोलिसांनी त्याला अटक करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी अन्सारी याने अगोदरच दबा धरून बसलेल्या सहकार्यांना बोलावून पोलिसांवर सशस्त्र आक्रमण केले आणि नंतर ते पळून गेले. यामध्ये योगेश जाधव, पोलीस हवालदार रमेश हाडळ आणि अन्य एक कर्मचारी घायाळ झाले. घायाळ स्थितीतही पोलिसांनी ३ जणांना अटक केली. अन्य १२ कसायांचा पोलीस शोध घेत आहेत. या ठिकाणच्या ९ गायी आणि वासरे यांची सुटका केली.
या प्रकरणी तारापूर पाच मार्ग पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पुणे येथे ‘हलाल अर्थव्यवस्था आणि भारत’ या विषयावर श्री. रमेश शिंदे यांचे ३१ जुलैला जाहीर व्याख्यान !
जर्मनीमध्ये जिहाद्याने ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाच्या संचलनामध्ये घुसवली व्हॅन : १ जणा ठार, तर १६ जण घायाळ
संभल (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांमधील २ समुदायांमधील वादातून ठार मारण्याची धमकी
मिरज येथे भक्तीमय वातावरणात ‘बाळगोपाळ दिंडी सोहळा’ उत्साहात !
पाकमध्ये टीटीपीच्या आक्रमणात १२ सैनिकांसह १५ जण ठार
नागपूर येथे अल्पवयीन मुलीचे धर्मांतर आणि निकाह !