मिरज येथे ‘आर्टस्, कॉमर्स, सायन्स कॉलेज’च्या वतीने महिला सबलीकरण विभागात ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन
मिरज (जिल्हा सांगली) – मुली-स्त्रिया यांचे मानसिक आणि आध्यात्मिक सबलीकरण आवश्यक आहे. त्यासाठी प्रतिदिन स्वरक्षण प्रशिक्षण, कुलदेवतेचा आणि ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप किमान १ घंटा करणे आवश्यक आहे, असे आवाहन सनातन संस्थेच्या वैद्या (श्रीमती) मृणालिनी भोसले यांनी केले. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या ‘आर्टस्, कॉमर्स, सायन्स कॉलेज’च्या वतीने महिला सबलीकरण विभागात २० जानेवारी २०२२ या दिवशी ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या.
या ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन आणि प्रास्ताविक महिला सबलीकरण विभागाच्या प्रमुख प्राध्यापिका सौ. पी.जी. पाटील यांनी केले, तर आभारप्रदर्शन सौ. हक्के यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक सूर्यवंशी यांनीही मनोगत व्यक्त केले.
विशेष
सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी मार्गदर्शन आवडल्याचे सांगितले. प्राध्यापिका सौ. पी.जी. पाटील यांनी पुढच्या वेळी ‘आपण प्रत्यक्ष मार्गदर्शन आयोजित करू’, असे सांगितले.