भाजपच्या वतीने महावितरण कार्यालयावर मोर्चा !
जळगाव – राज्य सरकार म्हणजे एक आंधळा, एक बहिरा आणि एक मुका, अशी गांधीजींची ३ माकडे आहेत, अशी टीका गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली. महावितरण पुष्कळ तोट्यात आहे, त्यामुळे ‘वीजदेयके भरा’, असे आवाहन ऊर्जामंत्र्यांकडून वारंवार करण्यात येत आहे, तर दुसरीकडे देयके थकलेल्यांची वीजजोडणी कापण्यात येत आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या पिकांची ऐन हंगामात हानी होत आहे. या वीजदेयकांच्या सूत्रावरून येथे भाजपचे नेते आणि आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या वतीने २७ जानेवारीला महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. त्या वेळी ते बोलत होते.