पैठण (संभाजीनगर) येथे ५३ जणांचा ख्रिस्ती धर्म त्यागून ‘हिंदु धर्मात पुनर्प्रवेश’ !

धर्मजागरण विभाग आणि नाथवंशज यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. पैठणच्या ब्राह्मण सभेने यासाठी पुढाकार घेतला, तसेच पैठणच्या वेदशास्त्रसंपन्न पंडितांनी या धर्मविधीचे पौरोहित्य केले.

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे ७ सहस्र आधार कार्डमध्ये अवैधरित्या पालट आणि नवीन नोंदणी करणार्‍यांना अटक

इतक्या मोठ्या संख्येने अवैधरित्या पालट केले जात असतांना सरकारी अधिकार्‍यांना याची माहिती का मिळाली नाही ?

जालना आणि अंबड येथे दिली निवेदने !

ख्रिस्ती नववर्षारंभाच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी जालना येथे उपजिल्हाधिकारी, तसेच अंबड येथे तहसील कार्यालय तथा पोलीस गोपनीय शाखेत समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

पुणे जिल्ह्यातील प्रशासन, पोलीस तसेच शाळा-महाविद्यालये यांना निवेदनाद्वारे गैरप्रकार रोखण्याचे आवाहन !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलीस आणि प्रशासन यांना ३१ डिसेंबर या दिवशी होणारे गैरप्रकार रोखण्यासंदर्भातील निवेदन देण्यात आले. या वेळी पोलीस अधिकारी आणि तहसीलदार यांनी समितीच्या उपक्रमाचे कौतुक केले.

भाजपचे आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

कणकवली येथे संतोष परब यांच्यावर प्राणघातक आक्रमण झाले होते. या प्रकरणी आमदार राणे आणि गोट्या सावंत यांच्या जामीनअर्जावर २८ आणि २९ डिसेंबर असे दोन दिवस सुनावणी झाली; मात्र न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.

अल्‍पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्‍याप्रकरणी फादरला सश्रम जन्‍मठेप

हिंदु संतांना अटक करण्‍यासाठी वारंवार आवाहन करणारे लोकप्रतिनिधी अशा घटनांविषयी काही बोलत नाहीत, हे लक्षात घ्‍या !

गोव्यात कोरोनाबाधित २६१ नवीन रुग्ण

गोव्यात ३० डिसेंबर या दिवशी कोरोनाविषयी ३ सहस्र ६१० चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये २६१ नवीन रुग्ण आढळले. कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढून ते ७.२२ टक्के झाले आहे. राज्यात कोरोनाबाधित एकूण रुग्णसंख्या ८५६ वर पोचली आहे.

सांगली जिल्ह्यात निवेदने दिल्यानंतर शाळा-महाविद्यालय आणि प्रशासनाकडून कृतीशील प्रतिसाद मिळणे !

३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी समितीच्या वतीने सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी निवेदन देण्यात आली. या अभियानात १७ लोकप्रतिनिधी, २९ प्रशासकीय अधिकारी, तसेच १८ अन्यांना निवेदन देण्यात आली.

कोल्हापूर जिल्ह्यात निवेदने दिल्यानंतर प्रशासनाकडून कृती करण्याचे आश्वासन !

३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात ११ प्रशासकीय अधिकारी, ३८ शाळा, १२ महाविद्यालये यांना निवेदने देण्यात आली, तसेच ५५ हून अधिक फलकांवर प्रबोधनपर मजकूर लिहिण्यात आला.