जालना आणि अंबड येथे दिली निवेदने !

हिंदु जनजागृती समितीची ३१ डिसेंबरच्या रात्री होणारे गैरप्रकार रोखण्याविषयी मोहीम

जालना येथे उपजिल्हाधिकारी, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी केशव नेटके यांना निवेदन देतांना राष्ट्रप्रेमी

जालना – ख्रिस्ती नववर्षारंभाच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी जालना येथे उपजिल्हाधिकारी, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयात, तसेच अंबड येथे तहसील कार्यालय तथा पोलीस गोपनीय शाखेत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

जालना येथे उपजिल्हाधिकारी, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी केशव नेटके यांनी निवेदन स्वीकारले. जालना येथील धर्मप्रेमी रवींद्र वरघणे, जगदीश शिंदे, रावसाहेब ठुबे, बद्री अवठे यांनी निवेदन दिले.

अंबड येथे तहसील कार्यालयात रवि कांबळे यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

अंबड येथे तहसील कार्यालयात अव्वल कारकून रवि कांबळे, तसेच गोपनीय शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल रामेश्वर मूलक यांनी निवेदन स्वीकारले. अंबड येथील समितीचे अंबिलवादे, महेश शहाणे, सुनील देशमुख, अजय देशमुख, आर्. महाजन, शिवाजी घोडके, राहुल अंबिलवादे, बियाणी यांनी निवेदन दिले.