कोल्हापूर जिल्ह्यात निवेदने दिल्यानंतर प्रशासनाकडून कृती करण्याचे आश्वासन !

गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथे गट शिक्षणाधिकारी नवलकुमार हलबागोल (उजवीकडे) यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

कोल्हापूर, ३० डिसेंबर (वार्ता.) – ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात ११ प्रशासकीय अधिकारी, ३८ शाळा, १२ महाविद्यालये यांना निवेदने देण्यात आली, तसेच ५५ हून अधिक फलकांवर प्रबोधनपर मजकूर लिहिण्यात आला होता, तसेच २२ ठिकाणी प्रवचने घेण्यात आली. हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी, वाचक, साधना सत्संगातील जिज्ञासू यांचाही चांगला सहभाग होता.

आजरा (जिल्हा कोल्हापूर) येथे शिक्षण विस्तार अधिकारी विलास पाटील (डावीकडे) यांनी निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रवीण पाटील आणि श्री. आनंदराव साठे
कोल्हापूर येथे राजर्षि छत्रपती शाहू महाराज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे प्राचार्यांना निवेदन देतांना श्री. श्रीकांत दिवाण


३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखणे आवश्यक ! – दिगंबर सानप, निवासी नायब तहसीलदार, हातकणंगले

हातकणंगले (जिल्हा कोल्हापूर) – ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त करून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनावर योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना हातकणंगले येथील निवासी नायब तहसीलदार दिगंबर सानप यांनी दिल्या. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे आदित्य शास्त्री, धर्मप्रेमी अभय शिंदे, साईराज डांगे, अक्षय डांगे, प्रथमेश गावडे, धनंजय यादव उपस्थित होते.

शाहूवाडीच्या साहाय्यक पोलीस निरीक्षक शैलजा पाटील यांना निवेदन देतांना व्यावसायिक चेतन शहा, महेश विभुते, अशोक देशमाने, केतन गांधी, धनलोभे, विजय गांधी, हिंदुत्वनिष्ठ चारुदत्त पोतदार, रोहित पास्ते, संजय चव्हाण, समितीचे कार्यकर्त्यांसह २७ जण उपस्थित होते.

गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नागेंद्र अनंत मुतकेकर (डावीकडून तिसरे) यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

गडहिंग्लज – येथे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नागेंद्र अनंत मुतकेकर, उपजिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार जीवन क्षीरसागर, पोलीस उपअधीक्षक कार्यालयात पोलीस नाईक श्रीकांत देसाई, तसेच पंचायत समिती कार्यालयात गट शिक्षणाधिकारी नवलकुमार हलबागोल यांना निवेदन दिले.

आजरा (जिल्हा कोल्हापूर) येथे ठाणे अंमलदार एस्.ए. बामणे यांना निवेदन देतांना शिवसेना आजरा तालुका प्रमुख युवराज पोवार (डावीकडे), तसेच अन्य

आजरा – येथे पोलीस ठाणे अंमलदार एस्.ए. बामणे यांना, तहसीलदार आणि शिक्षण विस्तार अधिकारी विलास पाटील यांना निवेदन दिले. या वेळी शिवसेना आजरा तालुकाप्रमुख युवराज पोवार, धर्मप्रेमी रवि यादव, सागर नाईक, लहु सावरतकर आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. शिक्षणविस्तार अधिकार्‍यांनी ही निवेदने सर्व मुख्याध्यापकांना पाठवणार असल्याचे सांगितले.