चीनने लडाख सीमेवर तैनात केले रोबोट आणि स्वयंचलित मानवरहित वाहने !

चिनी सैन्याला थंडी सोसवत नसल्याचा परिणाम

चीनने लडाख सीमेवर तैनात केले रोबोट

नवी देहली – चिनी सैन्याला लडाखमधील कडाक्याच्या थंडीचा सामना करता येत नसल्याने चीनने भारतीय सैन्याचा सामना करण्यासाठी ‘रोबो आर्मी’ आणि स्वयंचलित मानवरहित वाहने उभी केली आहेत.

चीनने तिबेटमध्ये ८८ स्वयंचलित वाहने तैनात केली आहेत. यामध्ये लडाख सीमेवर अशा ३८ वाहनांचा समावेश आहे. त्यांचा उपयोग परिसराच्या निगराणीसाठी, तसेच शस्त्रे आणि आवश्यक वस्तू यांच्या पुरवठ्यासाठी केला जाणार आहे. चीनने तिबेटमध्ये स्वयंचलित ‘म्युले-२००’ ही मानवरहित वाहनेही तैनात केली आहेत. अवघड भागात पाळत ठेवण्यासमवेतच ही वाहने ५० किमीपर्यंत आक्रमण करू शकतात.