स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार तरुण पिढीला भावतील याची विरोध करणार्‍यांना भीती ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मांडलेले विचार तरुण पिढीला भावतील, याची लांगूलचालनाचे राजकारण करणार्‍यांना भीती वाटते म्हणून त्यांचा विरोध !

एस्.टी.च्या संपातून आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांची माघार !

न्यायालयात विलीनीकरणाचे सूत्र प्रलंबित आहे; म्हणून सारासार विचार केला. सरकारला नमते घ्यावे लागले. कर्मचार्‍यांवर अन्याय होणार नाही, असे वचन सरकारने दिले. आमचा कर्मचार्‍यांवर दबाव नाही. तेही आम्हाला बांधील नाहीत.’’

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय

सीताराम कुंटे यांचा कार्यकाळ ३० नोव्हेंबर या दिवशी संपत आहे.

शक्ती मिल येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींची फाशी रहित; जन्मठेपेची शिक्षा !

‘महिलांकडे एक वस्तू म्हणून पहाणारे हे आरोपी नैसर्गिक मृत्यू होईपर्यंत जन्मठेपेच्या शिक्षेस पात्र आहेत’, असे न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले. आरोपी पॅरोल किंवा फर्लोसाठी अर्ज करू शकत नाहीत, असेही नमूद केले आहे.

न्यायालयाने फरार घोषित केलेले परमबीर सिंह मुंबईत उपस्थित !

परमबीर सिंह यांनी सर्वाेच्च न्यायालयात मुंबई पोलिसांवर विश्वास नसल्याचे सांगत त्यांच्यावरील गुन्ह्याची केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

बलात्कारीत महिलांची मानहानी थांबण्यासाठी राज्यात ‘वन स्टॉप प्लेस’ कार्यपद्धती राबवणार ! – सौ. रूपाली चाकणकर, अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य महिला आयोग

पीडित महिलेवरील अत्याचाराच्या चौकशीची प्रक्रिया अनेक मास चालते. ही चौकशी एका आठवड्यात पूर्ण व्हावी, यासाठी ‘वन स्टॉप प्लेस’ ही योजना राबवण्यात येणार आहे.

१ डिसेंबरपासून १ ली ते ४ थी पर्यंतच्या शाळा चालू करण्यास मंत्रीमंडळाची अनुमती !

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, ग्रामीण भागासह शहरी भागात १ ली ते १२ वीच्या शाळा चालू करण्यात येणार आहेत. आम्ही विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि आरोग्यमय वातावरण देण्याचा प्रयत्न करू.

उद्योजक गौतम पाषाणकर यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला !

सदनिका खरेदीचे पूर्ण पैसे भरूनही ग्राहकास कागदपत्रे आणि सदनिका हस्तांतरीत न करून फसवणूक केल्याप्रकरणी उद्योजक गौतम पाषाणकर यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. या प्रकरणी पाषाणकर यांच्यासह दोघांवर गुन्हा नोंद केला.