उद्योजक गौतम पाषाणकर यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला !

उद्योजक गौतम पाषाणकर

पुणे – सदनिका खरेदीचे पूर्ण पैसे भरूनही ग्राहकास कागदपत्रे आणि सदनिका हस्तांतरीत न करून फसवणूक केल्याप्रकरणी उद्योजक गौतम पाषाणकर यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. या प्रकरणी पाषाणकर यांच्यासह दोघांवर गुन्हा नोंद केला. पाषाणकर यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यातही त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. या प्रकरणी महिपालसिंह ठाकोर यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. पाषाणकर भागीदार असलेल्या आस्थापनाच्या प्रकल्पात ठाकोर यांनी १ कोटी ५६ लाख ६३ सहस्र ९८७ रुपये देऊन सदनिका खरेदी केली; मात्र पाषाणकरांनी ती सदनिका सांगली येथील नागरी सहकारी पतसंस्थेकडे तारण ठेवून दोन कोटी रुपयांचे कर्ज काढले. त्यामुळे पाषाणकर यांनी आर्थिक फसवणूक करून तक्रारदारांनी दिलेल्या रकमेचा अपहार केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.