३ ‘व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिन’सह ७ जणांवर गुन्हा नोंद !

अमरावती हिंसाचार प्रकरण

अमरावती – अमरावती हिंसाचार प्रकरणात सामाजिक माध्यमांवर चुकीची माहिती पसरवल्याप्रकरणी ‘सायबर क्राईम’ पोलिसांनी ३ ‘व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिन’सह ७ जणांवर गुन्हा नोंद केला आहे, अशी माहिती अमरावती शहराच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी २३ नोव्हेंबर या दिवशी पत्रकारांशी बोलतांना दिली.