उत्तरप्रदेशातील धर्मांतराच्या प्रकरणात अटक केलेल्यांचा अल् कायदाशी संबंध

उत्तरप्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले की, महाराष्ट्रातून अटक करण्यात आलेले अ‍ॅडम आणि कौसर आलम यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीतून हे दोघेही अल् कायदाच्या विचारसरणीशी संबंधित आहेत.

हिंदूंना संरक्षण देणे, संघ शाखांचा विस्तार करणे आणि हिंदुहिताचा मार्ग प्रशस्त करणे, यांवर डॉ. मोहन भागवत भर देणार !

संघाच्या दसरा मेळाव्यात बोलतांना डॉ. भागवत यांनी पश्‍चिम बंगालमधील हिंदूंच्या हत्या आणि हिंदूंच्या घटणार्‍या लोकसंख्येमुळे होणार्‍या त्यांच्या पलायनाविषयी चिंता व्यक्त केली होती. या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या दौर्‍याला विशेष महत्त्व आहे.

चित्रपटगृहाचे मालक अंसल बंधूंना ७ वर्षांची शिक्षा

‘उपहार’ चित्रपटगृहाला १३ जून १९९७ मध्ये लागलेल्या आगीच्या प्रकरणी पटियाला हाऊस न्यायालयाने चित्रपटगृहाचे मालक सुनील अंसल आणि गोपल अंसल यांना पुरावे नष्ट केल्याच्या आरोपावरून प्रत्येकी ७ वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच २ कोटी २५ लाख रुपयांचा दंड ठोठावला.

फ्रान्समध्ये पुन्हा जिहादी आतंकवाद्याकडून पोलिसांवर चाकूद्वारे आक्रमण !

महंमद पैगंबर यांचे नाव घेत आणि अल्ला हू अकबरच्या घोषणा देत एका आतंकवाद्याने पोलिसांवर चाकूद्वारे आक्रमण केले. या आक्रमणात ३ पोलीस घायाळ झाले. या वेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आक्रमणकर्ता आतंकवादी घायाळ झाला.

हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी त्यांना बायबल वाटणार्‍या केरळच्या दोघा पाद्य्रांना अटक !

भारतात आतापर्यंत लाखो हिंदूंचे धर्मांतर होऊनही स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांतील आतापर्यंतच्या सरकारांनी धर्मांतरविरोधी कायदा केला नाही, हे लक्षात घ्या ! यावरून त्यांना हिंदूंवरील या आघाताशी काही देणेघेणे नाही, हे सिद्ध होते ! ही परिस्थिती पालटण्यासाठी आणि हिंदू अल्पसंख्य होण्यापूर्वी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

बागा येथे वेश्याव्यवसायावर कारवाई : ४ युवतींची सुटका

४ युवतींची सुटका करून त्यांना मेरशी येथील महिला सुधारगृहात ठेवण्यात आले, तर दलाल प्रवीण बोराटे याच्या विरोधात ‘भादंसं’चे कलम ३७९ (अ) (२) आणि वेश्याव्यवसाय प्रतिबंधक कायद्याचे कलम ३,४ आणि ५ अंतर्गत गुन्हा प्रविष्ट केला आहे.

गोव्यात भाजप सलग तिसर्‍यांदा सत्तेवर येणार असल्याचा राष्ट्रीय नेत्यांना आत्मविश्‍वास !  सदानंद शेट तानावडे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

ख्रिस्ती नववर्षाच्या प्रारंभी देशातील ५ राज्यांच्या निवडणुका होत आहेत आणि या पार्श्‍वभूमीवर भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक ७ नोव्हेंबर या दिवशी झाली. नवी देहली येथे ‘हायब्रीड’ पद्धतीने झालेल्या या बैठकीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या हस्ते करण्यात आले.

पर्यावरण दाखला न मिळवल्याने धारगळ, पेडणे येथील ‘आयुष’ रुग्णालयाला २३ लक्ष रुपयांचा दंड

याला उत्तरदायी असणार्‍यांकडून हा खर्च शासनाने वसूल करावा ! जनतेच्या म्हणजेच शासनाच्या पैशांतून हा दंड भरायला नको !

कणकवली तालुक्यातील अवैध व्यवसायांशी पोलिसांच्या असलेल्या हितसंबंधांची चौकशी करा ! – प्रदीप मांजरेकर, तालुकाध्यक्ष, काँग्रेस

अवैध व्यवसायांच्या विरोधात आणि पोलिसांचा नाकर्तेपणा किंवा त्यांचे व्यावसायिकांशी असलेले हितसंबंध यांविषयी आवाज उठवणे योग्यच; पण काँग्रेस महाराष्ट्राच्या सत्तेत सहभागी असतांना काँग्रेसवाल्याना अशी मागणी का करावी लागते ?

बाजारवाडी, डेगवे येथे घराला आग लागून २ घायाळ : साहित्यासह २ दुचाकी जळल्या

तालुक्यातील बाजारवाडी, डेगवे येथील रूपेश केसरकर यांच्या घराला ६ नोव्हेंबरला रात्री शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आग विझवण्याच्या प्रयत्नांत रूपेश केसरकर गंभीर घायाळ झालेे, तसेच त्यांचे भाऊ गंगाराम केसरकर हेही घायाळ झाले आहेत. रूपेश यांच्यावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत.