हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी त्यांना बायबल वाटणार्‍या केरळच्या दोघा पाद्य्रांना अटक !

हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी प्रतिमास १२ सहस्र रुपये मिळत असल्याची पाद्य्रांची स्वीकृती

भारतात आतापर्यंत लाखो हिंदूंचे धर्मांतर होऊनही स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांतील आतापर्यंतच्या सरकारांनी धर्मांतरविरोधी कायदा केला नाही, हे लक्षात घ्या ! यावरून त्यांना हिंदूंवरील या आघाताशी काही देणेघेणे नाही, हे सिद्ध होते ! ही परिस्थिती पालटण्यासाठी आणि हिंदू अल्पसंख्य होण्यापूर्वी हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! – संपादक

रिषू सुपौल आणि जॉर्ज

पाटलीपुत्र (बिहार) – सुपौल जिल्ह्यामध्ये ६ नोव्हेंबर या दिवशी हिंदूंना बायबल वाटणार्‍या केरळच्या दोघा पाद्य्रांना भीमपूर पोलिसांनी अटक केली. पाद्री जॉर्ज आणि रिषू सुपौल अशी त्यांची नावे असून ते शहरातील भेलाही भागात भाड्याने रहातात. रिषू सुपौल या महिला पाद्री आहेत. पोलीस त्यांची अधिक चौकशी करत आहेत.

१. सुपौल जिल्ह्यातील केवला गावामध्ये हे दोघे पाद्री दोघा हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत होते. त्यासाठी ते हिंदूंना विविध प्रलोभने दाखवत होते.

२. चौकशीमध्ये पाद्री जॉर्ज यांनी सांगितले की, हिंदूंचे धर्मांतर कामासाठी त्यांना प्रतिमास १२ सहस्र रुपये मिळतात. हे पाद्री ख्रिस्ती पंथ स्वीकारणार्‍यांनाही काही पैसे देत होते. आतापर्यंत या पाद्य्रयांना अनेक हिंदूंचे धर्मांतर केले आहे. त्यांनी अनेक कुटुंबांना ख्रिस्ती बनवले आहे.

३. पोलीस त्या दोघांच्या ओळखपत्रांसह त्यांची इतर कागदपत्रे गोळा करत आहेत. या प्रकरणी अद्याप कुणीही लिखित तक्रार प्रविष्ट केलेली नाही.

४. हे धर्मांतर रोखण्यासाठी आता संतप्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे. ‘ज्याप्रमाणे लोकांना प्रलोभने दाखवून त्यांचे धर्मांतर करण्यात येत आहे, ते पहाता केंद्र सरकारने त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करणे आवश्यक आहे’, असे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी म्हटले आहे.