बाजारवाडी, डेगवे येथे घराला आग लागून २ घायाळ : साहित्यासह २ दुचाकी जळल्या

सावंतवाडी – तालुक्यातील बाजारवाडी, डेगवे येथील रूपेश केसरकर यांच्या घराला ६ नोव्हेंबरला रात्री शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आग विझवण्याच्या प्रयत्नांत रूपेश केसरकर गंभीर घायाळ झालेे, तसेच त्यांचे भाऊ गंगाराम केसरकर हेही घायाळ झाले आहेत. रूपेश यांच्यावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत. या आगीत केसरकर यांच्या घरातील साहित्यासह २ दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. या घटनेत केसरकर कुटुंबियांची लाखो रुपयांची हानी झाल्याचा अंदाज आहे. स्थानिक ग्रामस्थांना रात्री विलंबाने आग विझवण्यात यश मिळाले. ७ नोव्हेंबरला पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पहाणी केली अन् माहिती घेतली.