फ्रान्समध्ये पुन्हा जिहादी आतंकवाद्याकडून पोलिसांवर चाकूद्वारे आक्रमण !

  • आक्रमणकर्त्याकडून ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा

  • ३ पोलीस घायाळ

  • पोलिसांच्या गोळीबारात आतंकवादी घायाळ

  • युरोपीय देशांपैकी फ्रान्समध्ये सर्वाधिक मुसलमान रहातात, त्यामुळे तेथे जिहादी आतंकवादी घटना अधिक घडतात. यातून ‘धर्मांध जेथे संख्येने अधिक असतात, तेथे ते अशा कारवाया करतात’, हे लक्षात घ्या ! – संपादक

  • फ्रान्समध्ये सातत्याने अशा घटना घडत आहेत आणि पोलीस त्यांच्यावर कठोर कारवाईही करत आहेत. भारतात अशा घटना घडल्यास पोलीस कठोर कारवाई करतील का  ? – संपादक

  • ‘आतंकवाद्यांना धर्म असतो’, हे त्या आतंकवाद्याने दिलेल्या घोषणेवरून तरी निधर्मीवादी मान्य करतील का ? – संपादक

कांस (फ्रान्स) – येथे महंमद पैगंबर यांचे नाव घेत आणि अल्ला हू अकबरच्या घोषणा देत एका आतंकवाद्याने पोलिसांवर चाकूद्वारे आक्रमण केले. या आक्रमणात ३ पोलीस घायाळ झाले. या वेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आक्रमणकर्ता आतंकवादी घायाळ झाला.  या आतंकवाद्याची अद्याप ओळख पटलेली नसली, तरी तो अल्जेरियातील रहाणारा असून तो ३७ वर्षांचा असल्याचे सांगण्यात आले. फ्रान्समध्ये यापूर्वी, म्हणजे २३ एप्रिलमधील एका घटनेत अशा प्रकारच्या झालेल्या आक्रमणात एका पोलिसाचा यात मृत्यू झाला होता. पोलिसांनी नंतर त्याला गोळ्या मारून ठार केले होते.