‘अमली पदार्थ, मद्यालये, वेश्याव्यवसाय यांचे ठिकाण’, अशी गोव्याची जगात प्रतिमा झाल्यास नवल नाही ! – संपादक
पणजी, ७ नोव्हेंबर (वार्ता.) बागा, हडफडे येथे एका हॉटेलमध्ये चालू असलेल्या वेश्याव्यवसायावर हणजुणे पोलिसांनी छापा टाकून यात गुंतलेल्या ४ युवतींची सुटका केली. तसेच प्रवीण निवृत्ती बोराटे, (वय ३१ वर्षे, मूळचा रहाणारा घाटकोपर, मुंबई आणि सध्या बागा, कळंगुट येथे रहाणारा) या दलालास कह्यात घेतले. (परराज्यांतील व्यक्ती येऊन गोव्यात वेश्याव्यवसाय चालवतातच कसे ? त्यांना पोलिसांचा धाक नाही का ? – संपादक) ४ युवतींची सुटका करून त्यांना मेरशी येथील महिला सुधारगृहात ठेवण्यात आले, तर दलाल प्रवीण बोराटे याच्या विरोधात ‘भादंसं’चे कलम ३७९ (अ) (२) आणि वेश्याव्यवसाय प्रतिबंधक कायद्याचे कलम ३,४ आणि ५ अंतर्गत गुन्हा प्रविष्ट केला आहे. दलाल प्रवीण बोराटे याला न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.