‘अनाम प्रेम, गोवा’ या परिवाराच्या वतीने वेलिंग, प्रियोळ येथे कोजागरी  पौर्णिमेच्या निमित्ताने ‘रासलीला’ हा कार्यक्रम भावपूर्णरित्या साजरा !

‘अनाम प्रेम, गोवा’ या परिवाराच्या वतीने १९.१०.२०२१ या दिवशी श्री शांतादुर्गा शंखवाळेश्वरी संस्थान, वेलिंग, प्रियोळ येथे कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने ‘रासलीला’ कार्यक्रम भावपूर्णरित्या साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सनातनच्या साधकांचाही सहभाग होता.

दिवाणी खटल्यात ‘डी.एन्.ए.’ (टीप) चाचणीची अनावश्यकता सांगणारे सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे !

‘एका प्रकरणामध्ये सर्वाेच्च न्यायालयाने वडिलोपार्जित संपत्तीचा मालकी वाद सोडवण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या ‘डी.एन्.ए.’ चाचणीची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिला. यासाठी न्यायालयाने अनेक खटल्यांचे संदर्भ दिले आणि ‘डी.एन्.ए.’ चाचणी ही सरसकट का करण्यात येऊ नये, हेही स्पष्ट केले. यासंदर्भातील माहिती या लेखात पहाणार आहोत.

साधकांनो, तुम्ही पाठवलेले लिखाण जागेअभावी लवकर प्रसिद्ध करता येत नसल्याने क्षमाप्रार्थी आहोत !

पूर्वीच्या तुलनेत आता साधकसंख्या वाढल्याने साधकांचे लिखाणही अनेक पटींनी वाढले आहे. पुढे जशी जागा उपलब्ध होईल, त्यानुसार लिखाण प्रसिद्ध करण्यात येईल…

साधकांना सूचना !

स्वतःच्या शारीरिक त्रासांमध्ये वाढ  झाल्याचे, तसेच आजाराचे निदान न झाल्याचे अनुभव असल्यास व साधकांचे तळहात आणि  तळपाय गुलाबी होणे, दैवी कण आढळणे, यांसारख्या अनुभूती कळवा.

भाग्यवान बनलो आपण । होऊनी साधक गुरुदेवांचे ।।

‘धर्मरक्षणासाठी श्रीविष्णूने अनेक अवतार धारण केले. आताही ते गुरुदेवांच्या रूपातून या भूतलावर अवतीर्ण झाले आहेत. हे विचार मनात चालू असतांना सुचलेले काव्यपुष्प पुढे देत आहे.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या युरोपमधील सूक्ष्म चित्रकर्त्या साधिका सौ. योया सिरियाक वाले यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेली जडण-घडण !

मी कर्तेपणा सोडून, देवाला शरण जाऊन, देवावर मन एकाग्र करून, तसेच ‘मी चित्र काढत नसून देवच माझ्या माध्यमातून ही सेवा करवून घेत आहे’, असा भाव ठेवून चित्र काढेपर्यंत मला ते सूक्ष्म चित्र दोन किंवा तीन वेळा काढावे लागायचे.

भावंडांच्या मुलांवर पितृवत् प्रेम करणारे आणि इतरांच्या आनंदात आनंद मानणारे श्री. कमलकिशोर आसारामजी तिवाडी (वय ६७ वर्षे) !

अधिवक्त्या कु. दीपा तिवाडी आणि त्यांची बहीण सौ. पौर्णिमा जोशी यांचे काका श्री. कमलकिशोर आसारामजी तिवाडी हे सनातन संस्थेच्या कार्यात विविध प्रसंगी सहभागी होतात. दोघी बहिणींना त्यांच्या काकांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

युरोप येथील पू. देयान ग्लेश्चिच यांना ‘स्वतःमध्ये रामराज्याची स्थापना कशी  करायची ?’, याविषयी ईश्वराने केलेले मार्गदर्शन

‘एक दैदिप्यमान राजप्रासाद संयमाने कुणाची तरी प्रतीक्षा करत आहे. या निर्मनुष्य प्रासादात सर्वत्र शांती आहे. मी या प्रासादाच्या जवळ जाऊन त्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला; पण दुर्दैवाने त्याची प्रवेशद्वारे माझ्यासाठी उघडली नाहीत. त्या वेळी माझे आणि ईश्वराचे सूक्ष्मातून पुढील संभाषण झाले.

भक्तवत्सल श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णप्राप्तीची तीव्र ओढ असलेल्या गोपी यांची भक्तीमय रासलीला !

आज कोजागिरी पौर्णिमा ! आजच्या पावन दिवशीच द्वापरयुगात श्रीकृष्णाने त्याच्या परम भक्त गोपी आणि राधा यांच्या समवेत रासलीला करून त्या माध्यमातून गोपी अन् राधा यांना साधनेतील सर्वाेत्तम आनंदाची अनुभूती दिली होती.

रुग्णालयातील सहकार्‍यांना सेवा अन् साधना यांचे महत्त्व सांगणार्‍या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या आधुनिक वैद्या (कु.) श्रिया साहा !

प्रयत्नपूर्वक प्रार्थना केल्यावर यांत्रिकपणे वाटणे आणि डोळे बंद करून केवळ परात्पर  गुरु डॉ. आठवले यांचे स्मरण केल्यास  अंतर्मनातून आत्मनिवेदन होऊन भावजागृती होणे.