साधकांना सूचना !

स्वतःच्या शारीरिक त्रासांमध्ये वाढ  झाल्याचे, तसेच आजाराचे निदान न झाल्याचे अनुभव आले असल्यास, ते कळवा !

स्थुलातील आपत्काळ जवळ येऊ लागला आहे. विविध माध्यमांतून तिसर्‍या महायुद्धाची लक्षणे दिसू लागली आहेत. त्यातच साधक आणि संत यांच्यावर होणार्‍या अनिष्ट शक्तींच्या सूक्ष्मातील आक्रमणांचे प्रमाण सध्या वाढले आहे. साधकांवर होणार्‍या वाईट शक्तीच्या आक्रमणांमुळे साधकांच्या शारीरिक आजारांमध्येही अचानक वाढ झाली आहे. या आजारपणाचे नेमकेपणाने निदान होत नसल्याचे आणि कोणतेही औषधोपचार लागू होत नसल्याचेही लक्षात आले आहे. साधकांना असे अनुभव आले असल्यास त्यांनी ते खालील पत्त्यावर लिहून पाठवावेत.


साधकांचे तळहात आणि  तळपाय गुलाबी होणे, दैवी कण  आढळणे, यांसारख्या अनुभूती कळवा !

साधकांचे शारीरिक त्रास वाढत असले, तरी काही साधकांना चांगल्या अनुभूतीही येत आहेत. काही साधकांचे तळहात आणि तळपाय हे गुलाबी किंवा पिवळसर होत असल्याचे, तसेच त्यांच्या तळहातांवर किंवा घरातील वस्तूंवर दैवी कण येत असल्याचे  लक्षात आले आहे.

‘सध्याच्या काळात साधकांवर सूक्ष्मातून होत असणार्‍या वाईट शक्तींच्या आक्रमणांचे प्रमाण वाढलेले असले, तरी त्या आक्रमणांपासून रक्षण होण्यासाठी कार्यरत असलेल्या शक्तीची ही स्थुलातून दिसणारी लक्षणे आहे.

वरील पालट कोणाच्या लक्षात आल्यास त्यांनी त्याची छायाचित्रे सविस्तर माहितीसह खालील पत्त्यावर पाठवावीत.

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालाचा पत्ता : ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन ४०३४०१