भाग्यवान बनलो आपण । होऊनी साधक गुरुदेवांचे ।।

प्रत्येक साधकाला व्यापक बनवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘धर्मरक्षणासाठी श्रीविष्णूने अनेक अवतार धारण केले. आताही ते गुरुदेवांच्या रूपातून या भूतलावर अवतीर्ण झाले आहेत. गुरुदेवांचे ‘हिंदु राष्ट्र’ निर्मितीचे अथक प्रयत्न पाहून, असे वाटते ‘जे त्रेतायुगी, द्वापरयुगी, केले’, तेच भगवंत आताही करत आहे. हे विचार मनात चालू असतांना सुचलेले काव्यपुष्प पुढे देत आहे.

सौ. स्वाती शिंदे

गुरुदेव असती प्रीतीचा सागर ।
राष्ट्र अन् धर्म कार्याचा करती अखंड जागर ।। १ ।।

कलियुगी या मंथन करती धर्म-अधर्माचे ।
युद्धच असे हे जणू सुर-असुरांचे ।। २ ।।

अमृतकुंभ मिळेल तयातून ‘हिंदु राष्ट्रा’चा ।
भाग्यवान बनलो आपण, होऊनी साधक गुरुदेवांचे ।। ३ ।।

– कु. स्वाती गायकवाड (आताच्या सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के)), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.६.२०१९)