साधकांनो, तुम्ही पाठवलेले लिखाण जागेअभावी लवकर प्रसिद्ध करता येत नसल्याने क्षमाप्रार्थी आहोत !

अनेक साधक अनुभूती, साधकांची गुणवैशिष्ट्ये आणि अन्य लिखाण दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी पाठवत असतात. साधकांचे असे लिखाण आमच्याकडे प्रलंबित आहे. दैनिकातील जागेनुसार प्राधान्याने काही लिखाण प्रसिद्ध करण्यात येत असून साधकांनी पाठवलेले सर्वच लिखाण आम्हाला जागेअभावी लवकर प्रसिद्ध करता येत नाही. यासाठी आम्ही क्षमाप्रार्थी आहोत. पूर्वीच्या तुलनेत आता साधकसंख्या वाढल्याने साधकांचे लिखाणही अनेक पटींनी वाढले आहे. पुढे जशी जागा उपलब्ध होईल, त्यानुसार लिखाण प्रसिद्ध करण्यात येईल. – संपादक