श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा वाढदिवस रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात भक्तीपूर्ण वातावरणात साजरा !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा वाढदिवस भाद्रपद अमावास्येला, म्हणजेच ६ ऑक्टोबर २०२१ या दिवशी आश्रमातील साधकांनी कृतज्ञताभावात साजरा केला.

गोवा पोलिसांच्या ‘सायबर’ गुन्हे विभागात पहिली अत्याधुनिक ‘सायबर फॉरेन्सिक’ प्रयोगशाळा कार्यान्वित

गोवा पोलिसांच्या ‘सायबर’ गुन्हे विभागात गोव्याची पहिली अत्याधुनिक ‘सायबर फॉरेन्सिक’ प्रयोगशाळा अखेर कार्यान्वित झाली आहे.

जिल्हा परिषदेत भाजपला, तर पंचायत समितीमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा !

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत सर्व पक्षांना संमिश्र प्रतिसाद !

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाही गोव्यात नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार

राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीची मात्रा (डोस) सर्व पात्र नागरिकांनी घेतल्याचा दावा शासनाकडून केला जात आहे, तसेच राज्यात कोरोनाचा संसर्ग अल्प होत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने सण-उत्सव साजरे करण्यासाठीचे निर्बंध हटवले आहेत.

पुणे येथील सनातन संस्थेच्या साधक विद्यार्थिनीचे सनदी लेखापालच्या परीक्षेत सुयश !

येथील सातारा रस्ता केंद्रातील १९ वर्षीय कु. सुहासिनी सुनील कुंभार हिने सनदी लेखापालच्या (सी.ए.) प्रथम सत्रातील परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवून यश संपादन केले आहे. तिने अभ्यासाला आरंभ करण्यापूर्वी प्रार्थना-कृतज्ञता व्यक्त करणे, अथर्वशीर्ष ऐकणे, नामजपादी उपाय असे आध्यात्मिक स्तरावरील प्रयत्न केले.

‘कॉर्डेलिया जहाजा’वरील पार्टीत अद्यापपर्यंत १६ जणांना अटक !

केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने ‘कॉर्डेलिया जहाजा’वरील पार्टीत धाड टाकल्याच्या प्रकरणात अद्यापपर्यंत १६ जणांना अटक केली आहे, अशी माहिती अमली पदार्थविरोधी पथकाचे क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे यांनी दिली आहे.

लखीमपूर (उत्तरप्रदेश) घटनेच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबरला महाविकास आघाडी सरकारची ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा !

अत्यावश्यक सेवा वगळून हा बंद असणार आहे, अशी माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ६ ऑक्टोबर या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.

सिंहगड रस्त्यावरील (पुणे) ज्ञानगंगा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेल्या वर्षीचे शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला !

इंग्रजी माध्यमांच्या शाळेचा मुजोरपणा अल्प करण्यासाठी अशा शाळा प्रशासनावर तत्परतेने कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !

डोंगरी (मुंबई) येथून १५ कोटी रुपयांचे ‘हेरॉईन’ कह्यात, २ जणांना अटक !

केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने ६ ऑक्टोबर या दिवशी डोंगरी येथे धाड टाकून ७ किलो ‘हेरॉईन’ हा अमली पदार्थ कह्यात घेतला आहे. याचे मूल्य १५ कोटी रुपये इतके आहे. या कारवाईत २ जणांना अटक करण्यात आली

नवरात्रोत्सवाची सिद्धता पूर्ण : प्रतिघंट्याला ७०० भाविकांना श्री महालक्ष्मीदेवीचे ‘ई-दर्शन पास’द्वारे दर्शन होणार !

साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरातील नवरात्रोत्सवाची सिद्धता पूर्ण झाली आहे. संपूर्ण मंदिरावर विद्युत् रोषणाई करण्यात आली आहे.