मुंबई – उत्तरप्रदेशमधील लखीमपूर येथे शेतकर्यांना गाडीखाली मारल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून ११ ऑक्टोबर या दिवशी ‘महाराष्ट्र बंद’ घोषित करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळून हा बंद असणार आहे, अशी माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ६ ऑक्टोबर या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. मंत्रीमंडळाच्या बैठकीत याविषयी चर्चा झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून ही घोषणा करण्यात आली.