जिल्हा परिषदेत भाजपला, तर पंचायत समितीमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा !

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत सर्व पक्षांना संमिश्र प्रतिसाद !

नागपूर – राज्यातील नागपूर, पालघर, धुळे, नंदुरबार, अकोला आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये झालेल्या जिल्हा परिषद आणि ३८ पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी ६ ऑक्टोबर या दिवशी पार पडली. ‘मिनी विधानसभा’ समजली जाणारी ही पोटनिवडणूक सर्वच पक्षांसाठी महत्त्वाची आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ८५ जागांपैकी भाजपने सर्वाधिक २२, तर पंचायत समितीच्या १४४ जागांपैकी काँग्रेसने सर्वाधिक ३७ जागा जिंकल्या. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांमधील इतर मागासवर्गीय समाजाचे आरक्षण न्यायालयाने रहित केल्यामुळे या जागांसाठी ही पोटनिवडणूक घेण्यात आली.

जिल्हा परिषद निवडणूक !

पंचायत समिती निवडणूक

पंचायत समितीच्या एकूण १४४ जागांपैकी काँग्रेसने सर्वाधिक ३७ जागा जिंकल्या. काँग्रेसच्या खालोखाल भाजपला ३४ जागा, शिवसेनेला २४, वंचित बहुजन आघाडीला १९, राष्ट्रवादी काँग्रेसला १७ जागा मिळाल्या, तर अन्य पक्षांनी १३ जागा जिंकल्या. यामध्ये धुळे येथील ३० जागांपैकी भाजपने १५ जागा जिंकून सर्वाधिक यश मिळवणे, नागपूर येथे ३१ जागांपैकी काँग्रेसने १६ जागा मिळवणे आणि अकोला येथील २८ जागांपैकी वंचित बहुजन आघाडीने १६ जागा जिंकणे हे लक्षवेधी ठरले. नंदुरबार, वाशिम आणि पालघर येथे सर्व पक्षांना संमिश्र प्रतिसाद मिळाला.