मुंबई – केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने ६ ऑक्टोबर या दिवशी डोंगरी येथे धाड टाकून ७ किलो ‘हेरॉईन’ हा अमली पदार्थ कह्यात घेतला आहे. याचे मूल्य १५ कोटी रुपये इतके आहे. या कारवाईत २ जणांना अटक करण्यात आली. ३ दिवसांपूर्वी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने मुंबईतून गोवा येथे जाणार्या ‘कार्डेलिया क्रूझ’वर धाड टाकून अमली पदार्थ कह्यात घेतले होते. या ठिकाणी अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मुंबईतील विविध भागांतील अमली पदार्थांच्या पुरवठादारांची नावे उघड झाली आहेत.