चाळीसगाव (जिल्हा जळगाव) तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस !

पिकांसह शेती वाहून जाण्याची शक्यता असून नदीवरील पुलाचे संरक्षक लोखंडी कठडे वाहून गेले आहेत. विजेचे खांबही उन्मळून पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे.

२ ऑक्टोबरपासून ७-१२ उतारा थेट घरपोच देणार ! – बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री

राज्याच्या महसूल विभागाकडून ई-पीक पहाणी, संगणकीकृत ७-१२, ‘ऑनलाईन फेरफार’, जलदगतीने जमिनीची मोजणी, सामूहिक गावठाण मोजणी असे अनेक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

चोर्‍या रोखण्यासाठी नागरिकांनी सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी ! – पोलिसांचे आवाहन

सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे चोरी करणार्‍याची ओळख पटून त्याला अटक करणे एकवेळ जमेल; पण चोरी कशी रोखणार ?

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियोजनासाठी सावंतवाडी नगरपरिषदेची २ सप्टेंबरला बैठक

पत्रकारांना माहिती देतांना नगराध्यक्ष संजू परब म्हणाले, ‘‘उत्सवाच्या काळात वाढणारी वर्दळ, विक्रेत्यांची वाढणारी संख्या, स्थानिक व्यापार्‍यांना कोणताही त्रास होऊ नये, तसेच वाहतूक कोंडी होऊ नये आदी विषयांवर या वेळी चर्चा होणार आहे.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका व्यक्त होत असतांनाही आशीर्वादासाठी यात्रा काढल्या जात आहेत !

लोकांचे जीव धोक्यात येऊ शकतील, असे उपक्रम राबवले जात आहेत. देशात समाजकारणापेक्षा राजकारण १०० टक्के केले जात आहे, हे आपले दुर्दैव आहे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त करत भाजपला टोला लगावला.

लैंगिक अत्याचारापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी महिलांनी ‘मार्शल आर्ट्स’ शिकावे ! – सौ. सुलक्षणा सावंत

स्वरक्षण प्रशिक्षण घेतल्यास महिला त्यांच्यावर आक्रमण होत असतांना किंवा त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न होत असतांना विरोध करू शकतात.

सरकार गणेशोत्सवापूर्वी टॅक्सीचालकांच्या प्रश्नावर निर्णय घेईल ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

टॅक्सीचालकांना विश्वासात घेऊन या प्रश्नावर योग्य उपाययोजना केली जाईल.

ठाणे महानगरपालिकेच्या साहाय्यक उपायुक्तांवरील आक्रमणाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपंचायती आणि नगरपरिषद प्रशासनाकडून निषेध

अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करतांना ठाणे महानगरपालिकेच्या साहाय्यक उपायुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर एका परप्रांतीय व्यावसायिकाने धारदार शस्त्राने आक्रमण केले.

नावडे (जिल्हा रायगड) येथील पू. शांताराम महाराज खानावकर (वय ७५ वर्षे) यांचा देहत्याग !

प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते; मात्र त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

अमेरिकेसाठी युद्ध संपले, भारतासाठी चालू !

अमेरिकेसाठी जरी हे युद्ध संपले असले, तरी भारतासाठी ते चालू झाले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. पाक आतंकवादाला खतपाणी घालणारा देश आहे, हे आंतरराष्ट्रीय स्तरावर पटवून देतादेता आपल्याला अनेक दशके लोटली, तेवढा वेळ चीनच्या संदर्भात मिळणार नाही..