सातारा ते पुणे महामार्ग दुरुस्तीसाठी ५० कोटी रुपयांची तरतूद !

सातारा ते पुणे महामार्गावरील अपघात, दुर्घटना टाळण्यासाठी, महामार्ग आणि सेवा रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी ५० कोटी रुपयांची तरतूद केल्याचे जाहीर केले.

भायखळा कारागृहातील ३९ बंदीवानांना कोरोनाची लागण

मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात येत असतांना भायखळा येथील महिलांच्या कारागृहातील ३९ बंदीवानांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. यामध्ये ६ मुलांसह एका गर्भवती महिला बंदीवानाचाही समावेश आहे.

शहापूर येथे विवाहितेवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत !

महिलांनो, ओळखीच्या व्यक्तीशीसुद्धा किती प्रमाणात जवळीक साधायची, याचे तारतम्य बाळगा !

‘ऑनलाईन मोडी लिपी’ कार्यशाळेचे आयोजन !

या कार्यशाळेत मोडी लिपीचा उदय, विकास, पुनरुज्जीवन, प्रशिक्षण, अर्थार्जनाचे साधन आणि वर्णमाला यांविषयी मार्गदर्शन केले जाईल.

नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका ! – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कंत्राटदारांना चेतावणी

येथील सिंहगड रस्त्याच्या उड्डाणपुलाच्या कामाचे भूमीपूजन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती नुकतेच झाले.

श्राद्ध करण्यामागील शास्त्र समजून कृती केल्याने आपल्याला अधिक लाभ होतो ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती

लोहाना महिला मंडळ आणि गुजराती महिला मंडळ यांच्याकडून ‘पितृपक्ष’ विषयावर ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे आयोजन

जालना-नांदेड समृद्धी महामार्गाच्या बाजूने ‘बुलेट ट्रेन’ नेण्यासाठी प्रस्ताव दिला आहे ! – अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री

जालना-परभणी-हिंगोली-नांदेड हा रस्ता १९० कि.मी.चा असून तो थेट तेलंगणापर्यंत व्हावा, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही विनंती करण्यात येत आहे. त्यामुळे यापुढील रस्ता राष्ट्रीय महामार्गाने केला, तर तो भाग्यनगरपर्यंत जोडता येणार आहे.

मानद पशू कल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी दिलेल्या बातमीच्या आधारे अवैधरित्या गोवंशियांच्या मांसाची वाहतूक करणार्‍या दोघांवर पुणे येथे गुन्हा नोंद !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही प्रतिदिन गोहत्या होत आहेत, हे चिंताजनक आहे.

माहिती कार्यालये अधिक सक्षम आणि सुसज्ज करण्यावर भर देणार ! – डॉ. संभाजी खराट, माहिती उपसंचालक

शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्याचे काम जिल्हा माहिती कार्यालयातून अधिक प्रभावी व्हावे, यासाठी माहिती कार्यालये अधिक सक्षम करण्यावर भर देणार असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट यांनी केले.