लोहाना महिला मंडळ आणि गुजराती महिला मंडळ यांच्याकडून ‘पितृपक्ष’ विषयावर ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे आयोजन
धनबाद (झारखंड) – हिंदु धर्मामध्ये ‘पितृऋण’ चुकवण्यासाठी श्राद्धविधी करण्याचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे; परंतु समाजाला श्राद्ध करण्याचे महत्त्व आणि त्यासंदर्भात धर्मशास्त्राचे ज्ञान नसल्यामुळे श्राद्धाविषयी अनेक अपसमज पसरलेले आहेत. अशा वेळी श्राद्ध करण्यामागील शास्त्र समजून कृती केल्याने आपल्याला अधिक लाभ होतो, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वाेत्तर भारत समन्वयक श्री. शंभू गवारे यांनी केले. या कार्यक्रमाचा लाभ धनबाद आणि रांची येथील जिज्ञासूंनी घेतला.
पितृपक्षानिमित्त येथील लोहाना महिला मंडळ आणि गुजराती महिला मंडळ यांनी एका ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे आयोजन केले होते. या वेळी मार्गदर्शन करतांना श्री. गवारे यांनी ‘पितृपक्षामध्ये कोणत्या दिवशी श्राद्ध करणे उपयुक्त आहे ? श्राद्ध कुणी करावे ? सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात श्राद्ध करण्यासाठी पुरोहित न मिळाल्यास काय करावे ? श्राद्धाला लागणारे साहित्य न उपलब्ध नसल्यास काय करावे ? पितृदोष दूर करण्याचे उपाय काय आहेत ?’, अशा अनेक प्रश्नांची उत्तर दिली. या प्रवचनाच्या आयोजनासाठी लोहाना समाजाच्या अध्यक्षा सौ. गीता दलाल यांचे विशेष योगदान लाभले.